भ्रष्टाचाराचा रोग


                       असा चालतो राज्यकारभार 

                                                                                       










 ६ एप्रिल २०२३

लाच स्विकारताना वीज वितरणचे वाडा शाखेचे सहाय्यक अभियंता याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले नुसती इतकीच बातमी देऊन प्रतिबंधक पथकाने थांबू नये , त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत काय निर्णय झाला याचीही बातमी द्यावी नाहीतर बोलाची कढी आणि बोलाचा भात , ह्योही माझोच आणि तोही माझोच
रंगे हात पकडले असे दाखवून लोकांना चुतीया बनवणे ! असे नको नाहीका ?

Ajab Nyay - अजब न्याय सरकारचा


                            सेवा न देताच वसुली 

                               सरकारचा अजब न्याय 

 आता वेगवान निर्णय घ्यायचे म्हणजे हुकूमशाही करावीच लागणार नाही का ?

           लोक अदालतची  हि जनतेला गुगली 


 BSNL ने  landline ग्राहकांकडून सेवा न देता बिल वसुली केली . देवगड मधील BSNL कार्यालय अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे सर्वश्रुत आहेच आणि प्रत्येक ग्राहकास त्याचा अनुभवही आहे .त्याचं  झालं असं मला १८ मार्चला २०२३ लोकअदालतचि नोटीस आली .तशी देवगड तालुक्यातील अनेक ग्राहकांना आली .जुलै ऑगस्ट २०२० चे landline चे बिल भरले नसल्यामुळे तडजोड करण्यासाठी ची ती नोटीस होती .माझा landline ५ मे २०२० पासून बंद होता म्हणून मी लेखी तक्रार केली , मे जून २०२० चे बिल मला आले , ५ मे पासून फोन बंद असल्यामुळे मी बिल काही भरले नाही .पुन्हा लेखी तक्रार केली , मला BSNL च्या अधिकाऱ्याने आश्वासन दिल कि हे मे जून २०२० चे बिल भरा  तुमचा फोन चालू करतो .फोन तर काही चालू झालाच नाही पण जुलै ऑगस्ट २०२० चे हि बिल आलं . मी ते बिल भरलं नाही . माझ्याकडे सर्व तक्रार केलेल्याच्या पोच पावत्या , बिल भरल्याची पावती सर्व काही होत .

लोकअदालतचि नोटीस आली आणि मला थोडं हायस वाटलं ,चला ग्राहकांच्या बाजूने आपली बाजू तरी न्यायालयात मांडता येईल निदान देवगड BSNL कार्यालय किती बेजबाबदार आहे हेतरी सांगता येईल , सेवा न देताच पैसे भरणा करा म्हणून नोटीस आलेले अनेक ग्राहक त्या दिवशी तिथे असणार याची मला खात्री होती , आणि त्यामुळे आपली बाजू मांडायला खूपच सोप्प जाणार होत .

देवगड च्या लोकअदालत  मध्ये वेळेत पोचलो. BSNL ग्राहकांची भेट घेतली आम्ही सर्वजण एकाबाजूला बसलो , बँका आणि कर्जदार यांच्या तडजोडी चालू होत्या , मी पुढेच बसलो होतो , न्यायाधीश साहेब मधेच विचारते झाले - तुमचं काय ? मी म्हटलं BSNL , ते लगेच म्हणाले इथे नाही मागच्या बाजूला , आमच्या सर्व BSNL ग्राहकांची वरात मागच्या बाजूला , चौकशी करता कळलं कि एक टेबल टाकून BSNL चे अधिकारी वसुलीसाठी बसलेले होते .एक देवगडचे आणि एक सावंतवाडीचे ! मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं कि लोक अदालतचि नोटीस आहे ना मग न्यायाधीश साहेब ,  वकील आहेत कुठे , ? इथे ते कुणी नाही आमच्याबरोबरच तडजोड करायची आहे 

आणि मग त्या सरकारी अधिकाऱ्याने आपल्या सरकारी खाक्यात असं काही ग्राहकांना घेतलं कि अनेक जण अर्ध तर अर्ध बिल भरायला तयार झाले, मी म्हटलं मी नाही बिल भरणार, मग अधिकारी म्हणाले कोर्टाची नोटीस येईल तेव्हा तुम्हाला भारावीच लागेल , मी म्हटलं मग आटा माझ्या हातात नोटीस आहे ती कुणाची ?  नंतर त्याचे एकच  उत्तर तुम्ही  जाऊ शकता घरी .

नोटीस लोक अदालतचि,  पण बाजू ऐकणारे न्यायाधीश साहेब , वकील कुणीच नव्हते  , लोक अदालतचि नोटीस देऊन लोकांना सहज  फसवलं   मूळ मुद्दा - सेवा ना देताच बिल वसुली करत आहेत हि ग्राहकांची बाजू ऐकायला कुणीच नव्हते. मी हि तडजोड करून बिल भरून टाकलं. कारण   

लोक अदालतचि नोटीस देऊन जर लोक अदालत लोकांशी अशी वर्तणूक करणार असेल तर न्याय मागायचा कुणाकडे ? 

  त्या नोटीस मध्ये " तरी प्रकरण तडजोडीने निकाली होणे करिता दिनांक 30 एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालत मध्ये ठेवण्यात येईल " असे स्पष्ट लिहिलेले आहे .आणि प्रत्यक्षात न्यायाधीश साहेब नाहीत वकील नाही आणि अदालत हि नाही सगळाच  बकवास !

-----गणेश वेलणकर , नाडण , देवगड 

जोडीदार निवडतांना । Jodidar nivadatanna । भाग २

  जोडीदार निवडतांना । Jodidar nivadatanna ।

नातं ....

---- नातं म्हटलं कि त्याचा थेट संबंध मानसिकतेशी जातो , आणि मानसिकता म्हणजे भावनांचा खेळ ! भावनांचा खेळ आपल्या नात्याचे भविष्य ठरवत असतो आणि त्या भावना म्हणजे प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम

आजच हे धाकदगदीचे जीवन , बदललेला काळ असे म्हणून आपण जीवनातील या अत्यंत महत्वाच्या मानसिक पैलूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो . हेच पैलू आपले जीवन सुखी करीत असतात..

बदललेले दृष्टिकोन ..... . गृहिणी - कुटुंबाचा आधारस्तंभ , कि जिच्यामुळे कुटुंबव्यवस्था अबाधित होती ,प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम या सर्व भावना तिच्या ठायी असायच्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याची शिकवण कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला देत असे आणि ती म्हणजे " आई " आता काळ बदलला म्हणजे समाजाने बदलला ,जीवनातील मूल्ये बदलली , जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला , तंत्रज्ञाना मुळे कुटुंबातील भावनांचा एक घट्ट बंध होता तो सैल झाला एकमेकांपासून दुरावले , एकाच छताखाली राहत असले तरी काहीसे एकमेकांना अनोळखी , मूल्य - उत्कृष्ठ भावी पिढी घडवणाऱ्या या आईचे मूल्य हा समाज म्हणजे पर्यायाने पुरुष समजू शकले नाहीत .प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम ह्या गोष्टी जिच्याठायी होत्या तिला प्रत्येक बाबतीत गृहीतच धरलं गेलं तिच्यावर वर्चस्व गाजवलं गेलं .कालांतराने ती करिअर साठी घराबाहेर पडली . आणि नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली . आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस येण्याच्या मार्गावर राहिली . गरज कशाची - प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम .ह्या सातही हि गोष्टी ज्या दोघां जोडादारांमध्ये आहेत त्यांचे नाते कधीही तुटू शकत नाही , कितीही संकटं आली तरी या सात गोष्टी संकटावर सहज मात करतात . किंबहुना त्यांच्याइतकी सुखी जोडी दुसरी कोणती हि नाही ! तंत्रज्ञानामुळे जीवन जरी वेगवान झालं असाल तरी याच तंत्रज्ञानाने प्रत्येक व्यक्तीला आत्मकेंद्रित बनवलं . त्यामुळे वात्सल्य ,त्याग , विनम्रता , विश्वासआणि सर्वात महत्वाचा म्हणजे संयम ह्या गोष्टी हळू हळू मनातून हद्दपार होऊ लागल्या आणि त्यांची जागा अहंकाराने घेतली. प्रेम आणि आदर ह्या गोष्टी गरजेपुरत्याच राहिल्या . पैसा गाडी बंगला सर्व काही आहे पण सुख काय म्हणतात ते कधी अनुभवलच नाही अशी परिस्थिती बहुतांशी होते . काय करावं - नातं हे मनातील भावनाच्याच खेळावरती अवलंबून असत ,हे जोपर्यंत समाजाला , समाजाला कशाला आपल्यापासूनच सुरवात करूया - जोडीदार निवडतांना आपल्यामध्ये ह्या सातही गोष्टी आत्मसात करावयास शिकाव्या , जोडीदार होणाऱ्या कुटुंबाशी नुसतेच औपचारिक बोलण्या ऐवजी त्यांचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करावा ..पैसा जीवनात आरामदायी सुखवस्तू निश्चितच देईल पण सुख मिळेलच असे नाही .आपण ज्या जोडीदाराबरोबर आयुष्य सुरु केलं आहे ,तेव्हा सुरवातीच्या काळात त्याला समजून घेतलं तर पुढील आयुष्यात ते उपयोगी ठरेल . विशेष करून स्त्रियांचा हरवलेला पैलू " आई " होण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच जोडीदारामध्ये हवा तसा बदल घडू शकेल आणि दोघांमधील नातं निश्चितच घट्ट होईल लक्षात ठेवा - .आजच्या बदलत्या काळात व्यक्ती स्वातंत्र इतकं फाजील बोकाळलं आहे कि सतत एकमेकांवर कुरघोडी करण्या पलीकडे कोणताही संवाद होत नाही .जगण्यासाठी पैसा निश्चितच आवश्यक आहे पण जगण्याचे ध्येय पैसा असू नये . जीवन हे बंधन युक्त असेल तरच सुखी होऊ शकत.

भिन्न संस्कार ,  भिन्न परिस्थियतीतीत  वाढलेली माणसे एकत्र राहू लागतात तेव्हा नेमकं काय करणं आवश्यक आहे , घटस्फोटापर्यंत का वेळ यावी या सर्वाचा उहापोह पुढील लेखात ....

घटस्फोट ? का ? आणि कशासाठी । Divorce ? Why ?



Next

दीप अमावस्या - आषाढ अमावस्या

                                                                      ।। श्री ।।                                     आषाढ अमावस्या - दीप अमा...