आठवतात ते दिवस .................
मला अजूनही आठवतंय , १९८५/८६ चा काळ असावा त्यावेळी मुंबईला आम्हा कलाकारांचा एक ग्रुप होता. नेहमीचेच कार्यक्रम नको म्हणून आम्ही , आज “ होऊन जाऊदे धिंगाणा “ नावाचा जो कार्यक्रम आज दूरदर्शन वर चालतो तश्याच पद्धतीचा एक कार्यक्रम मुंबई दूरदर्शनवर करण्यासाठी आम्ही बसवला.
१९७२ साली मुंबई दूरदर्शन चा स्टुडिओ सुरु झाला , पहिले “ मुंबई दूरदर्शन “ हेच नाव होत नंतर “ सह्याद्री “ झालं . त्या वेळेला आजच्या सारखा पैशांचा खेळ नक्कीच नव्हता
आणि याकूब सईद आणि बबन प्रभू हि जोडगोळी खूपच प्रसिद्ध होती. याकूब सईद हे कार्यक्रम हेड असल्यामुळे कार्यक्रम सादर करावयाचा असेल तर त्यांना भेटावं लागायचे
. त्यांच्या भोवती आजच्यासारखे ग्लॅमरस वलय नव्हतं आणि त्यामुळे त्यांची भेटही सहज होत असे. आम्ही आमच्या कार्यक्रमाची संकलपना सांगितली आणि थोडी कार्यक्रमाची फित हि दाखवली .त्यांनी पहिली आणि आम्हाला ऑफिस मध्ये घेऊन गेले. " कसं आहे वेलणकर " ते बोलते झाले तुम्ही कार्यक्रम कसा सादर केला आहे हे आम्ही पाहतोच पण त्याचा प्रमाणे काय सादर केले आहे हेही पाहणे गरजेचे आहे ,तुम्ही चांगल सादर केले असल तरी असा पोरखेळ आम्ही नाही दाखवणार , अस्या प्रकारच्या कार्यक्रमाची प्रेक्षकांना गोडी लागली तर रोज आम्हाला असे पोरखेळच करावे लागतील , तेव्हा सॉरी , आपल्याकडे चांगले चांगले लेखक आहेत त्यांच्या नाटिका सादर करा आपण नक्की दूरदर्शन वर दाखवू.
त्यानंतर आमच्या ग्रुपचे नाटक झालं , कीर्तन हि झाले शालेय कार्यक्रम केले ,सेलिब्रेटींनीच कार्यक्रम सादर करावे अशी संकुचित वृत्तीही नव्हती असो पण आम्हाला धिंगाणा काही घालू दिला नाही ( त्यांच्या भाषेत पोरखेळ )
" अस्या प्रकारच्या कार्यक्रमाची प्रेक्षकांना गोडी लागली तर रोज आम्हाला असे पोरखेळच करावे लागतील "त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार काही प्रमाणात आज खरे ठरले हे नक्की !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा