। । श्री । ।
शब्दाचा इतिहास
एक सत्तर ऐशी वर्षांपूर्वी कोकणात उत्पन्नाचे साधन काहीच नव्हतं , म्हणजे शेती होती पण एकाच कुटुंबाला पुरेल इतकी , मुलगे त्यांच्या पत्नी त्यांची मुले , कुटुंब वाढत गेलं , आणि शेती खूपच अपुरी पडायला लागली . मुलांना उत्पन्नाची साधनं शोधण्याची गरज भासली , त्यावेळी कोकणात व्यवसाय हा दृष्टिकोन एक कल्पनाविलास होता , नोकरी / चाकरी करणे हा एकमेव पर्याय होता , बरं नोकरी कोकणात मिळणे कठीणच , शिक्षण हि गोष्ट पूर्णपणे ऐच्छिक होती. ज्याला त्यावेळी शिक्षणाचे महत्व कळले तेच शिक्षण घेत, पण ती सुद्धा पाच ते दहा टक्के , त्यामुळे शहरात जाऊन नोकरी करणे हाच एकमेव पर्याय राहिला . त्यात काही तरुण शहरात जायला मिळते म्हणून नोकरी करत , तर काही अगदी मना विरुद्ध इच्छा नसतांना जबरदस्तीने नाईलाजास्तव शहरात नोकरीला जात होते.
आता सणासुदीला जेव्हा हे तरुण गावाकडे रजा काढून येत. तेव्हा गावात राहणारी मंडळी त्यांना “ या चाकरमानी “ असे कौतुकाने म्हणत असत . नोकरी करणारा तो चाकर मानी , यात कमीपणाची कुठलीही भावना नव्हती . कारण चाकरी करण्याची किती गरज आहे हे प्रत्येक गावात राहणाऱ्याला माहित होत . आणि म्हणूनच ‘ या चाकरमानी ‘ असे म्हणतांना त्यात प्रेम कौतुक आदर होता .
कालांतराने दृष्टिकोन बदलतात त्यामुळे काळ बदलतो ,आणि चाकरमानी उपहासात्मक म्हणू लागले , कमीपणाचे वाटू लागले त्यामुळे काही बुद्धिहीन असलेले बुद्धिवान , चाकरमानी यांना कोकण वासी म्हणू लागले
पण या तथाकथित बुद्धिवाद्यांना हे कुठे समजण्याची अक्कल आहे कि - कोकणात राहणार स्थायिक त्याला कोकणवासी म्हणतात आणि जो नोकरी करणारा तो चाकरमानी , सध्याचा काळात जो कोकणात नोकरी करतो तोहि चाकरमानी च असतो
Vinata Social media