Ajab Nyay - अजब न्याय सरकारचा


                            सेवा न देताच वसुली 

                               सरकारचा अजब न्याय 

 आता वेगवान निर्णय घ्यायचे म्हणजे हुकूमशाही करावीच लागणार नाही का ?

           लोक अदालतची  हि जनतेला गुगली 


 BSNL ने  landline ग्राहकांकडून सेवा न देता बिल वसुली केली . देवगड मधील BSNL कार्यालय अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे सर्वश्रुत आहेच आणि प्रत्येक ग्राहकास त्याचा अनुभवही आहे .त्याचं  झालं असं मला १८ मार्चला २०२३ लोकअदालतचि नोटीस आली .तशी देवगड तालुक्यातील अनेक ग्राहकांना आली .जुलै ऑगस्ट २०२० चे landline चे बिल भरले नसल्यामुळे तडजोड करण्यासाठी ची ती नोटीस होती .माझा landline ५ मे २०२० पासून बंद होता म्हणून मी लेखी तक्रार केली , मे जून २०२० चे बिल मला आले , ५ मे पासून फोन बंद असल्यामुळे मी बिल काही भरले नाही .पुन्हा लेखी तक्रार केली , मला BSNL च्या अधिकाऱ्याने आश्वासन दिल कि हे मे जून २०२० चे बिल भरा  तुमचा फोन चालू करतो .फोन तर काही चालू झालाच नाही पण जुलै ऑगस्ट २०२० चे हि बिल आलं . मी ते बिल भरलं नाही . माझ्याकडे सर्व तक्रार केलेल्याच्या पोच पावत्या , बिल भरल्याची पावती सर्व काही होत .

लोकअदालतचि नोटीस आली आणि मला थोडं हायस वाटलं ,चला ग्राहकांच्या बाजूने आपली बाजू तरी न्यायालयात मांडता येईल निदान देवगड BSNL कार्यालय किती बेजबाबदार आहे हेतरी सांगता येईल , सेवा न देताच पैसे भरणा करा म्हणून नोटीस आलेले अनेक ग्राहक त्या दिवशी तिथे असणार याची मला खात्री होती , आणि त्यामुळे आपली बाजू मांडायला खूपच सोप्प जाणार होत .

देवगड च्या लोकअदालत  मध्ये वेळेत पोचलो. BSNL ग्राहकांची भेट घेतली आम्ही सर्वजण एकाबाजूला बसलो , बँका आणि कर्जदार यांच्या तडजोडी चालू होत्या , मी पुढेच बसलो होतो , न्यायाधीश साहेब मधेच विचारते झाले - तुमचं काय ? मी म्हटलं BSNL , ते लगेच म्हणाले इथे नाही मागच्या बाजूला , आमच्या सर्व BSNL ग्राहकांची वरात मागच्या बाजूला , चौकशी करता कळलं कि एक टेबल टाकून BSNL चे अधिकारी वसुलीसाठी बसलेले होते .एक देवगडचे आणि एक सावंतवाडीचे ! मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं कि लोक अदालतचि नोटीस आहे ना मग न्यायाधीश साहेब ,  वकील आहेत कुठे , ? इथे ते कुणी नाही आमच्याबरोबरच तडजोड करायची आहे 

आणि मग त्या सरकारी अधिकाऱ्याने आपल्या सरकारी खाक्यात असं काही ग्राहकांना घेतलं कि अनेक जण अर्ध तर अर्ध बिल भरायला तयार झाले, मी म्हटलं मी नाही बिल भरणार, मग अधिकारी म्हणाले कोर्टाची नोटीस येईल तेव्हा तुम्हाला भारावीच लागेल , मी म्हटलं मग आटा माझ्या हातात नोटीस आहे ती कुणाची ?  नंतर त्याचे एकच  उत्तर तुम्ही  जाऊ शकता घरी .

नोटीस लोक अदालतचि,  पण बाजू ऐकणारे न्यायाधीश साहेब , वकील कुणीच नव्हते  , लोक अदालतचि नोटीस देऊन लोकांना सहज  फसवलं   मूळ मुद्दा - सेवा ना देताच बिल वसुली करत आहेत हि ग्राहकांची बाजू ऐकायला कुणीच नव्हते. मी हि तडजोड करून बिल भरून टाकलं. कारण   

लोक अदालतचि नोटीस देऊन जर लोक अदालत लोकांशी अशी वर्तणूक करणार असेल तर न्याय मागायचा कुणाकडे ? 

  त्या नोटीस मध्ये " तरी प्रकरण तडजोडीने निकाली होणे करिता दिनांक 30 एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालत मध्ये ठेवण्यात येईल " असे स्पष्ट लिहिलेले आहे .आणि प्रत्यक्षात न्यायाधीश साहेब नाहीत वकील नाही आणि अदालत हि नाही सगळाच  बकवास !

-----गणेश वेलणकर , नाडण , देवगड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Next

दीप अमावस्या - आषाढ अमावस्या

                                                                      ।। श्री ।।                                     आषाढ अमावस्या - दीप अमा...