फॉरवर्ड करण्याची संस्कृती

 आठवतात ते दिवस

आजची forward करण्याची संस्कृती .......
मी मध्ये एका संगीत गाण्याच्या ( live instruments ) स्पर्धेला गेलो होतो . अर्थातच माझ्या मित्राने त्यात भाग घेतला होता. आपल्या नित्यनियमा प्रमाणे पाहुण्यांचे व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत आभार प्रदर्शन झालं. आणि वेळ जाऊ नये म्हणून आयोजकांनी लगेच कार्यक्रमाला सुरवात करावी अशी घोषणा केली . साऊंड सिस्टिम वाल्याची धावपळ सुरु झाली कसेबसे त्याने पटकन माईक लावून घेतले कार्यक्रम सुरु झाला . आता गाण्यांचा कार्यक्रम , त्यातून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजिचा साऊंड त्याला जवळ पास पाच पन्नास विशिष्ठ ऍडजेस्ट मेन्ट केल्याशिवाय तो नीट येतच नाही. बरं त्या टेकनॉलॉजिचा अभ्यास त्या ऑपरेटरचा किती आहे हा एक संशोधनाचाच विषय असतो . व्हायचे तेच घडले पहिल्या स्पर्धकांचा आवाज काही नीट आला नाही , त्यामुळे त्याच्या गाण्याची काशी झाली . आणि आताचे परीक्षक ऍडव्हान्स टेकनॉलॉजि वापरल्या शिवाय गायकाचे कौशल्य समजण्याची त्यांची क्षमता नाही .काल संगीत शिकावयास घेतले आणि आज परीक्षक झालो . मीडियाची कृपा ! त्यामुळे पहिले दोनतीन स्पर्धक साउंड बरोबर नाही म्हणून बाद झाले. ( हा त्यांच्यावर अन्यायच झाला नाही का ? ) पण हे बघतो कोण अगदी अयोजकांसकट आम्ही फक्त forward करणारी मंडळी. विचार आमचे थांबलेले आहेत , अभ्यास करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे संपुष्टात आली आहे . आवाज येतो आहे ना बस झालं .
तो काळ मात्र असा नव्हता , दोनतीन माईक आणि एक साधे लोकांपर्यंत आवाज पोचेल याच क्षमतेचे मशीन. परीक्षक म्हणून जाण हेच सन्मानाचे प्रतीक होते .. त्यामुळे परीक्षकांचा अभ्यास त्याचे अनुभव त्यांची संगीतातली तपश्चर्या हे सर्व पाहूनच परीक्षक म्हणून बोलावीत असत आणि व्यवहार जमला नाही म्हणून परीक्षकाला बोलावता आले नाहीं असें कधीच व्हायचे नाही कारण किती रकमेचे मानधन हा दृष्टिकोनच नव्हता. गायकाचा आवाज परीक्षका पर्यंत पोचणं हेच महत्वाचे होत साऊंड सिस्टीम आवाज जरी गुणवत्तेने उच्चं नसला तरी गायकाचे आणि इतर कलाकारांचे गुणकौशल्य समजण्याची परीक्षकांची क्षमता होती . त्यामुळे कोणत्याच स्पर्धका वर कोणत्याच गोष्टी मुळे अन्याय होत नसे . या विषयावर खूप काही सांगण्यासारखे आहे . पण तूर्तास इतकेच बास नाहीतर अजीर्ण होईल
तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी सर्वांनाच स्पर्धका पासून आयोजकांपर्यंत अभ्यासाची कष्ट घेण्याची गरज आहे. आजच्या फॉरवर्ड करण्याच्या संस्कृतीत ते बसत नाही.
धन्यवाद Vinata Social

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Next

फॉरवर्ड करण्याची संस्कृती

  आठवतात ते दिवस आजची forward करण्याची संस्कृती ....... मी मध्ये एका संगीत गाण्याच्या ( live instruments ) स्पर्धेला गेलो होतो . अर्थातच म...