।। श्री ।।
बाजार
मला अजूनही आठवतात ते दिवस साधारण सन १९८४ /८५ चा काळ असेल , त्या वेळी मुंबई दूरदर्शन वर “ गजरा “ म्हणून एक कार्यक्रम असे. त्यावेळच्या प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेले , त्यामध्ये छोटे छोटे प्रवेश असत कि ज्यामधून , विनोदी ,गंभीर ,सामाजिक प्रश्न ,समाजातील अनेक व्यक्तींच्या स्वभावाचे पैलू , अश्या विविध अंगांनी हा कार्यक्रम सादर व्हायचा . विशेष म्हणजे दूरदर्शन वरचा प्रेक्षक वर्ग आठवड्यातून एकदाच असला तरी वार लक्षात ठेऊन आतुरतेने पाहत होता कारण तो अत्यंत जिवंत होता ,उत्कृष्ठ लेखन , दिग्दर्शन कलाकार ,सर्व सर्वच अफाट असायचं कलेतील आविष्कारांचे सुंदर दर्शन घडत असे . महत्वाचे म्हणजे दूरदर्शन वरच्या कार्यक्रमाची लोकप्रियता हि कलाकारांवर ठरत असे ! त्यामुळे प्रमोशन , वारंवार कार्यक्रमाच्या जाहिराती हे करण्याची गरजच नव्हती कारण जे मुळातच उत्कृष्ठ आहे ते सारखे सारखे कधीच सांगावं लागत नाही कि हे उत्कृष्ठ आहे !. फुल खिले हैं गुलशन गुलशन , आपली माती आपली माणसं , चित्रहार नाटक एकांकिका मुलाखती लहान मुलांसाठी किलबिल
त्यावेळी दूरदर्शन वरचे कार्यक्रम मोफत होते पण दर्जेदार होते.
हे आज प्रकर्षाने आठवलं कारण “ तुला शिकवीन चांगलाच धडा “ सीरिअल पाहून......
वडिलांचा लाथेने फेटा उडवला जातो इतका त्यांचा अपमान होतो तसेच हाडाची शिकशीका असतांना तिच्या पावित्रावर शंका घेणारे खोटारडे आरोप केले जातात . असे असतांना हि ती शिक्षिका मी कशी पवित्र आहे याचे लाजिरवाणी समर्थन देते आहे .
वास्तविक हे सर्व पाहिल्या आणि ऐकल्यानंतर तिच्या पायाची आग मस्तकात जायला हवी होती . “ कुणा कुठल्या गुंडाने सांगितलेलं तुम्हाला खरं वाटत. आणि माझ्यावर तुमचा विश्वास नाही . आज लग्नाच्या दिवशी इतका अविश्वास मग लग्न झाल्यावर मला “ बाजारी औरत “ म्हणूनच घोषित कराल , मलाच तुमच्या या नंदीबैलाशी लग्न करायचं नाही , ताबडतोब चालते व्हा इथून ”.व्यक्तिरेखा हि त्याच्या स्वभाव आणि विचारांप्रमाणे वागत असते हेच आताच्या लेखकांना समजत नाही .
27 जून २०२३ चा भागाचं लिखाण तर इतकं दयनीय होत कि सीरिअल पाहणेच सोडून दिल . आजच्या एकूण मराठी दूरदर्शन वरच्या सीरिअल बघून एकूणच निर्मितीची दयनीय अवस्था झाली आहे ,
आज कार्यक्रमाचा दर्जा कलाकार नाही , तर मीडिया म्हणजे पर्यायाने multinational कंपन्या ठरवतात . बाजारात विक्रीला असलेल्या वस्तू प्रमाणे !
असेच दर्जेदार लेख वाचण्यासाठी यावर क्लिक करा