ती फुलराणी 

best TV सीरिअल 


सोनी मराठी वरील ऑगस्ट २०१८ पासून प्रसारित झालेली “ ती फुलराणी “ नुकतीच सिरीयल पहिली आणि दोन तीन दिवस खूप अस्वस्थ वाटत होत .
चैन पडत नव्हतं , काय करावं काही कळत नव्हतं . कशातच लक्ष लागत नव्हतं.
का ? का ? का अशी अवस्था झाली ?, एकदा दोनदा तीनदा सारखे पुन्हा पुन्हा एपिसोड पाहत होतो तरी मन समाधानी होत नव्हतं.
बुद्धीने सांगितलं …. असे व्हायला एकच कारण "मयुरी वाघ" . हो…. मनाने हि कौल दिला , हेच कारण
त्यावेळी ती सीरिअल किती पॉप्युलर झाली माहित नाही कदाचित मीडिया वाल्यांना भावले नसेल.आणि तसंही आज कलाकारांना विचारतो कोण कारण कला हे क्षेत्रच मीडियाच्या हातात गेलं आहे किंबहुना पैसाच ठरवतो कलाकाराचे कौशल्य . मयुरीच्या एका मुलाखतीतही असे दिसून हि आले कि आज कलाकाराच्या गुणांना कोण विचारतो !
सीरिअल मधील नायक सांगायचा तू न बोलताच तुझ्या मनातले कळत मला , हि नुसती नायकाची शब्द फेक नसून प्रेक्षकांनाही समजत होत मंजिरीला काय म्हणायचं आहे .केवळ तिचा चेहरा आणि डोळे पाहून वास्तवातच अशी मंजिरी व्यक्ती आहे कि काय अशी मनात शंका येऊ लागते. आणि वाटत मंजिरी सारखी मुलगी प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात यायला हवी .
यु ट्यूब वरचा मयुरीचा प्रत्येक एपिसोड वास्तवात जगावा तसा मी जगत होतो .प्रत्येक एपिसोड मध्ये मंजिरी अस्वस्थ करायची चेहऱ्यावर उमटणारे भाव आणि शब्दांविना बोलणारे डोळे " निव्वळ अप्रतिम "
यावरून समजत कि त्या व्यक्तिरेखरला मयुरी वाघ ने किती न्याय दिला आहे ,
अस्वस्थता जात नव्हती डोळ्यासमोरून व्यक्तिरेखा हलत नव्हती
डोळ्यासमोर मयुरी वाघ असतांनाच एक व्यक्तिरेखा उभी राहिली आणि एकत्र कुटुंबाचे महत्व सांगणारी हृदय हेलावणारी "संघर्ष " नावाची कथा फुलू लागली आणि मनातील अस्वस्थता कमी झाली. लवकरच शॉर्ट फिल्म स्टोरी प्रसारित होईल .
ती फुलराणीच्या टीम चे खूपखूप धन्यवाद कि मयुरी वाघ सारख्या गुणी अभिनेत्रीला मंजिरी हि व्यक्तिरेखा साकारायला दिली . एकूणच ती सीरिअल मनाला स्पर्शून जाते .
१९७५ चा काळ असावा त्यावेळी पु ल देशपांडे लिखित " ती फुलराणी " नाटक स्टेजवर आलं . तेव्हा मी सातवीत शाळेत शिकत होतो. त्यावेळी मी माझ्या कुटुंबाबरोबर ते नाटक पाहिलंही असेल , पण आता लक्षात नाही . आणि नाटक समजून लक्षात राहील असं माझं वयही नव्हतं .
अश्या गुणी अभिनेत्रीला उत्तरोत्तर अश्याच आव्हानात्मक भूमिका मिळाव्यात हीच ईश्वर चरणी प्रार्थना
- गणेश वेलणकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Next

फॉरवर्ड करण्याची संस्कृती

  आठवतात ते दिवस आजची forward करण्याची संस्कृती ....... मी मध्ये एका संगीत गाण्याच्या ( live instruments ) स्पर्धेला गेलो होतो . अर्थातच म...